फायटोफ्थोरा हि बुरशी सर्वाधिक धोकादायक असून जगभरातून लिंबूवर्गीय फळबागा
आणि नर्सरी प्रभावित करते. जुलै व ऑगस्ट महिन्यात होत असलेल्या पावसामुळे फायटोफ्थोरा या बुरशीमुळे लिंबू
वर्गीय पिकांमध्ये पायकुज, मूळकुज व पाणगळ आणि रोप वाटिकेत रोपे कोलमडणे आणि
मुळकुज या रोगांची लागण होऊ शकते आणि प्रौढ झाडा मध्ये त्यांच्या उत्पन्नात घट होऊ शकते. त्यामुळे फायटोफ्थोरा या बुरशीमुळे होणाऱ्या
रोगाविषयी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
फळरोपवाटीकेतील रोग :-
लिंबूवर्गीय फळरोपवाटिकेत
रोप कोलमडणे आणि मूळकूज हे रोग प्रामुख्याने आठळतात ते पुढीलप्रमाणे
१) रोप कोलमडणे :-
सततचा पाऊस व अयोग्य
निचऱ्याची जमीन या रोगाला पोषक आहे. याचा प्रादुर्भाव व प्रसार जमिनीतून होत असून
बियाणे वाफ्यात उगवण्यापूर्वीच कुजते किंवा बियाण्याचा कोंब जमिनीचा
पृष्ठभागापर्यंत पोहचण्यापूर्वीच मरतो.
रोपवस्थेतील मृत्यू-
रोपाच्या जामिलगतच्या खोडला
प्रादुर्भाव होऊन रोगग्रस्त भाग नरम पडतो व कालांतराने भुरकट, काळपट होऊन खोड
कोलमडून पडते व मरते.
नियंत्रण –
१. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटीकेमध्ये बियाण्याची लागवड गादीवाफ्यावर करावी.
पेरणीच्यापूर्वी बियाण्यास ३ ग्रॅम मेटालाक्झिल प्रती किलो बियाणे या प्रमाणात
बीजप्रक्रिया करावी. रोपवाटिकेसाठी सतत एका जागेची निवड करू नये.
२. या रोगास प्रतिकारक/ सहनशील खुंटाचा वापर करावा. रोगाचा प्रादुर्भाव मोठया
प्रमाणावर आथळल्यास मेटालाक्झिल या बुरशीनाशकाचे मिश्रण २ ग्रॅम/लिटर या प्रमाणात
रोपजवळ ओतावे.
२. मुळकुज :-
या रोगाची लागण झाल्यास
रोपे/कलमांची पाने मलूल होतात. मुख्य शिरा पिवळ्या होतात व नंतर पूर्ण पाने पिवळी
होउन गळतात. रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झाल्यास पूर्ण पाने गळून
रोपांचे/कलमांची मोठ्या प्रमाणात मार होते.
नियंत्रण-
या रोगाच्या नियंत्रणासाठी
मेटालाक्झिल २ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमानात मिश्रण तयार करून रोपाभोवती
ओतावे.
3. बागेतील मुळकुज व डिंक्या रोग –
फाळबागेमध्ये या रोगामुळे
रोगग्रस्त झाडांची पाने फिक्कट दिसून शीर पिवळी पडते. काहीवेळा पानावर जांभळ्या/
काळ्या रंगाचे चट्टे पडून पानगळ होते. फळे काळी पडून गळतात. तसेच उर्वरित फळांची
पूर्ण वाढ होत नाही. झाडाचा कलम केलेला भाग जमिनीलगत किंवा आत गाडला गेल्यास त्या ठिकाणी चिकट द्रव स्रवतो, त्यामुळे
बुंध्याभोवतालची साल सडून पुढे झाड दगावते. संक्रमित झाडाची साल मुबलक डिंक रक्तपेशींच्या आवरणांतून हळूहळू रसद्रव बाहेर
पाझरून तो पेशीजालांवर किंवा पेशीजालांत साठणे चालू होते. लिंम्बावरील डिंक, पावसळ्या नंतर अदृश्य पण कोरडया स्वरुपात बुंध्यावर राहतो व लहान खड्यांच्या स्वरुपात दिसतो. विकृती हळूहळू झाडाला विळखा
घालते. अयोग्य
निचऱ्याच्या जमिनीत पानावर जांभळे/ काळे डाग पडून संपूर्ण पानांची गळ होते.
त्याचप्रमाणे जमिनीतील झाडाचा जारवा सडून नष्ट होतो. त्यामुळे झाड दगवण्याची
संभावना खूप अधिक प्रमाणात असते.
नियंत्रणाचे उपाय-
१.
बागेमध्ये पाणी साचत असल्यास उथळ चर खोदुन पावसाचे पाणी शेताबाहेर काढावे.
२.
संत्र कलम उंच (साधारण ३० सें.मी. किंवा जास्त) बांधणीची घ्यावी.
३.
झाडाच्या बुंध्यास जमिनीपासून १ मी. उंची पर्यंत बोर्डो मलम (१:१:१०) लावावा.
४. झाडांची मुले कुजत असल्यास ९ इंच परीयंत जमीनिची उकरी करून २० ग्रॅम
मेटालाक्झिल प्रती लिटर पाणी या प्रमाणात एका झाडासाठी वापरावे.
लेखक : - अमोल विजय शितोळे (पी. एच. डी. कृषि)
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
खूपच छान माहिती आहे, धन्यवाद
ReplyDelete