Tuesday, 13 December 2016

बोर्डो मिश्रण कमी खर्चात करते पिकांवरील रोगनियंत्रण



पीक संरक्षणात वापरण्यात येणाऱ्या  अनेक बुरशीनाशकांमध्ये  बोर्डो मिश्रणाचे स्थान अग्रगण्य आहे. फ्रान्समधील बोर्डो या विद्यापीठातून या मिश्रणाचा शोध लागला.  म्हणून त्याला बोर्डो मिश्रण असे म्हणतात.. फ्रान्समध्ये १८७८ च्या सुमारास मोठ्या प्रमाणावर केवडा रोग (डावणी मिल्डू) उद्भवला होता त्यावेळी वरील मिश्रण फवारलेल्या बागांतील द्राक्षवेलींची पाने रोगमुक्त राहिल्याचे वनस्पतिशास्त्रचे प्रोफेसर मिलार्डेट यांना आढळले. मोरचूद चुना या मिश्रणामुळे रोगाला आळा बसला असावा असा त्यांनी निष्कर्ष काढला. त्यानंतर बोर्डो मिश्रणाचा बुरशीनाशक म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला, अशा प्रकारे बोर्डो मिश्रणाचा शोध सन १८८२ मध्ये मिलार्डेट या शास्त्रज्ञाने फ्रान्समधील बोर्डो या विद्यापीठात  लावला. बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी मोरचूद, कळीचा चुना पाणी यांची आवश्यकता असते. पिकाच्या अवस्थेनुसार सर्वसाधारणपणे टक्का, . टक्का, . टक्का, . टक्का, . टक्का, . टक्का तीव्रतेचे बोर्डो मिश्रण वापरतात. पण लहान नाजूक रोपांवर सौम्य अश्या कमी तीव्रतेचे मिश्रण वापरतात.
बोर्डो मिश्रण तयार करण्याची पद्धत :
बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी मोरचूद ठराविक प्रमाणात वजन करून घेऊन पाण्यात विरघळावे. हे द्रावण धातूच्या भांड्यात करता यासाठी लाकडी टीप, मातीची भांडी किंवा प्लास्टिकच्या भांड्याचा वापर करावा. बोर्डो मिश्रण तयार करण्याकरिता धातूची भांडी वापरू नयेत. % बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी किलो मोरचुद, किलो कळीचा चुना १०० लीटर पाणी वापरावे, याप्रमाणे मोरचुद  एक किलो घेवून ते प्लास्टिकच्या  बादलीत  पाच लिटर पाणी घेवून भिजवावे  आणि वेगळ्या प्लास्टिक चे बादलीत पुन्हा पाच लिटर पाणी घेवून त्यात कळीचा चुना भिजवावा मोरचूद व चुना पूर्ण भिजल्यावर हे मिश्रण गाळून घ्यावे . मोरचुदाचे द्रावण चुन्याचे द्रावण एकाच वेळी तिसरऱ्या प्लास्टिकच्या भांड्यात ओतून त्यानंतर त्यामध्ये हे मिश्रण १०० लिटर होईल इतके पाणी घालावे. मिश्रण तयार झाल्यावर त्याच दिवशी वापरावे. भविष्यातील वापराकरिता बोर्डो मिश्रण तयार करून किंवा साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे बोर्डो मिश्रणाचा वापर तयार केल्यापासून १२ तासांच्या आत करावा. तसेच वापरण्यापूर्वी ते रासायनिक दृष्ट्या उदासीन आहे याची खात्री करावी.
मिश्रण तयार करताना घ्यावयाची काळजी :
मिश्रण फवारणीच्या वेळी फडक्यातून किंवा बारीक चाळणीतून गाळून घ्यावे. मोरचूद विरघळण्यास उशीर लागतो, म्हणून फवारणी करण्याच्या दोन ते तीन तास अगोदर ते पाण्यात विरघळत ठेवावे. मोरचूद कापडी पिशवीत घेऊन लोंबकळत ठेवावे. तसेच मिश्रण करतेवेळी तिसऱ्या भांड्यात दोन्ही द्रावण ओतताना प्रथम चुन्याचे आणि पाठोपाठ मोरचुदाचे द्रावण ओतून मिश्रण सारखे ढवळावे. एकदा तयार केलेले मिश्रण त्याच दिवशी वापरावे.
बोर्डो मिश्रणाची चाचणी :
बोर्डो मिश्रणाची, तीव्रता तसेच सामू (पीएच) या दोन अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत.
बोर्डो मिश्रणाचा रंग आकाशी असावा तसेच सामू उदासीन (.००) असावा. तयार केलेल्या मिश्रणाची चाचणी निळा लिटमस पेपरने घ्यावी. निळा लिटमस पेपर द्रावणात बुडविल्यानंतर जर लाल झाला तर मिश्रणात अधिक मोरचूद आहे किंवा द्रावण आम्ल आहे असे समजावे. मिश्रणातील जास्त मोरचूद नाहीसे करण्यासाठी मिश्रणात परत चुन्याचे द्रावण निळा लिटमस पेपर निळाच राहीपर्यंत टाकावे. चाचणीची दुसरी पद्धत म्हणजे तयार मिश्रणात लोखंडी खिळा किंवा सळई दहा सें.मी. द्रावणात बुडविले असता त्यावर तांबूस रंग चढला तर (तांबडा दिसणारा थर तांब्याचे सूक्ष्म कण जमून झालेला असतो) द्रावण फवारण्यास योग्य नाही असे समजून थोडी थोडी चुन्याची निवळी ओतावी. ही निवळी ओतण्याची क्रिया लोखंडी खिळा किंवा सळई यावर जमणारा तांबडा थर नाहीसा होईपर्यंत करावी म्हणजे मिश्रण फवारण्यास योग्य होईल.
बोर्डो मिश्रणाचा उपयोग :
बोर्डो मिश्रण हे अल्प किंमतीमध्ये तयार होणारे, वापरण्यास बिनधोक बऱ्याच रोगांवर उपयुक्त आहे., रोपांचे मृत्यू, बटाट्यावरील करपा, द्राक्षावरील तंतुभुरी, लिंबावरील खैरा, भुईमुगावरील टिक्का, पानवेली, टोमॅटो, हळद, इत्यादींच्या पानांवरील ठिपक्यांच्या रोगावर ते वापरतात. फळ धारणेच्या  वेळी बोर्डो मिश्रण फवारताना  काळजी घेणे आवश्यक आहे.काही वेळा त्याच्या फवारण्यामुळे काही फळावर  परिणाम दिसू शकतो . काही पाश्चात्य देशांत मात्र निर्जलित बोर्डो मिश्रण तयार मिळते.
 १)      भाजीपाला पिकावरील रोगनियंत्रणासाठी बोर्डो मिश्रणाचा वापर:
बटाटा, टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळावर्गीय भाज्या, कोबी, वाटाणा . पिकांवरील करपा, काळा करपा, पानांवरील ठिपके, केवडा, भुरी, जिवाणूजन्य करपा अशा विविध रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रणाचा वापर करता येतो. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्रावणांची तीव्रता ठरवावी. साधारणतः भाजीपाला पिकांसाठी . ते .% तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारणीसाठी योग्य असते. यापेक्षा जास्त प्रमाण वापरल्यास काही पिकांमध्ये दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. जमिनीतील बुरशीमुळे होणारे मर, मूळकूज, खोडकूज, . रोगाच्या नियंत्रणासाठीसुद्धा बोर्डो मिश्रण एक टक्का हे एक उत्तम बुरशीनाशक आहे.
२)      फळपिकावरील रोगनियंत्रणासाठी बोर्डो मिश्रणाचा वापर:
१)      आंब्यावरील करपा रोग नियंत्रण साठी .% बोर्डो मिश्रण पावसाळा सुरू होण्यापूर्वी दोन फवारे आणि जून ते ऑगस्टपर्यंत फवारण्या कराव्यात.
२)      केळीच्या पानांवरील ठिपके नियंत्रणासाठी .% बोर्डो मिश्रण जून ते ऑगस्टपर्यंत - वेळा फवारणी करावी.
३)      डाळिंबाच्या पानांवरील रोग  नियंत्रणासाठी .% बोर्डो मिश्रण बहार धरल्यानंतर नवीन फुटीवर - फवारण्या  आणि फळांचा काढणी करेपर्यंत - फवारण्या करावेत.
४)      पेरूच्या पानांवरील रोग  नियंत्रणासाठी .% बोर्डो मिश्रण बहार धरल्यानंतर नवीन फुटीवर - फवारे तर देवी रोग नियंत्रणासाठी . ते % बोर्डो मिश्रण फळे लिंबाच्या आकाराची झाल्यानंतर पुढे - फवारे करावे.
५)      लिंबूवर्गीय संत्रा, मोसंबी लिंबू यांच्या पानांवरील बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी % बोर्डो मिश्रण बहरानंतर - फवारे तर जिवाणूंमुळे होणारा देवी रोग  नियंत्रणासाठी % बोर्डो मिश्रण वापरावे . शेंडामर नियंत्रणासाठी % बोर्डो मिश्रण वर्षातून - वेळा वापरावे.
६)      रंगपूर लिंबाच्या गादी वाफ्यावरील रोपासाठी अत्यंत कमी तीव्रतेचे (म्हणजे . ते . टक्का) तीव्रतेचे बोर्डो मिश्रण बुरशी रोगाच्या नियंत्रणासाठी चांगले परिणामकारक ठरलेले आहे. गादीवाफ्यावरील रोपांचे वय चार ते पाच महिने झाल्यावर . टक्का तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारावे. साधारणपणे दोन महिन्यांच्या अंतराने . टक्का तीव्रतेचे त्यानंतर परत दोन महिन्यांनी . तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारावे.
७)      रंगपूर कागदी लिंबाच्या दुय्यम रोपवाटिकेतील बदललेल्या रोपावर सप्टेंबर - क्टोबरमध्ये . टक्का जानेवारीफेब्रुवारी मध्ये . टक्का, मार्च - एप्रिलमध्ये . टक्का जूनच्या दुसऱ्या आठवड्यात टक्का तीव्रतेचे  बोर्डो मिश्रण फवारावे. त्यामुळे जवळपास सर्व प्रकारचे बुरशीजन्य रोग आटोक्यात राहतात. त्याचप्रमाणे मातृवृक्षावर दर तीन महिन्यांच्या अंतराने . टक्का तीव्रतेचे बोर्डो मिश्रण पावसाळा संपल्यावर सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये फवारावे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये . टक्का तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारावे. या वेळी झाडावर नवीन पालवी आलेली असेल. एप्रिलमध्ये एक टक्का तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारावे.
बोर्डो मिश्रणाची तीव्रता आम्ल-विम्लांक किंवा सामू (पीएच) या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. यावर या मिश्रणाची शक्ती अवलंबून असते. तयार झालेले बोर्डो मिश्रण फवारणीसाठी योग्य झाले किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. तयार झालेले बोर्डो मिश्रण शक् तितक्या लवकर फवारावे, ते जास्त वेळ ठेवू नये. मिश्रण तयार झाल्यानंतर १२ तासांच्या आतच वापरावी. (वरिल सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी याची खबरदारी घ्यावी)
लेखक : - डॉ. अमोल विजय शितोळे (पी. एच. डी. कृषि) डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
 

No comments:

Post a Comment