दुभत्या
जणावराचे योग्य व्यवस्थापन केल्यास दुध व्यवसाय फायदेशीर ठरतो. व्यवस्थापनामध्ये गुरांचे चारा पाणी, खाद्य,
आरोग्य आणि निगा या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. भारतात देशी गाईच्या एकून ३९
जाती आहेत व त्याची वर्गवारी दुधा साठी, ओढ्कामासाठी, आणि दुहेरी (दुध व
ओढ्कामासाठी) अशी केली जाते. भारतामध्ये दुग्धउत्पादनासाठी सहिवाल, लालसिंधी, गीर,
थारपारकर तर दुग्धउत्पादन व ओढ्काम अशा दुहेरी उपयोगासाठी हरियाना, देवनी,
कांक्रेज यांचा प्रामुख्याने समावेश होतो. महाराष्ट्रातील खिल्लार, डांगी या
ओढ्कामाच्या जाती आहेत.
सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा दुध
व्यवसाय करण्याकडे मोठ्या प्रमाणात कल
वाढत असून शेतीला जोडधंदा म्हणून करण्या ऐवजी मुख्य व्यवसाय म्हणून पाहिले जात
आहे. पण आता मात्र आधुनिक डेअरी व्यवसायामध्ये तंत्रज्ञान व यान्त्रीकीकरनामुळे
मजुरांची संख्या कमी होत आहे. आधुनिक गोठा, स्वयंचलित यंत्राच्या सहाय्याने दुध
काढणे, तसेच शेतीवरील बरीचशी कामे कंत्राटदाराकडून केली जातात त्यामुळे आज एक
व्यक्ती ५० पेक्षा जास्त गायींची देखभाल करतो.
Ø भारत हा देश अलीकडील काही वर्षापासून आधुनिकतेची कास धरत चाललेला देश
आहे.
Ø दुधामधील स्निग्धाचे प्रमाण तपासण्यासाठी अनेक ठिकाणी तपासणी केंद्र
उभारण्यात आली आहेत.
Ø दुध काढणीसाठी मोठ्या प्रमाणात दुध काढणी यंत्राचा वापर वाढला आहे.
Ø कृत्रिम रेतन करून मोठ्या प्रमाणात खर्च व वेळ वाचवता येतो.
Ø खाद्यानिर्मितीमधील आधुनिक तंत्राचा वापर करून विविध प्रकारच्या
गवतापासून मुरघास बनवून मोठ्या प्रमाणावर खर्च कमी करता येतो व जास्तीतजास्त उत्पन्न
मिळवता येते.
Ø मोठ्या प्रमाणामध्ये गायी असतील तर मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब
करून अत्याधुनिक तंत्राचा वापर करता येतो.
Ø मुक्त संचार गोठा पद्धतीमध्ये मिल्किंग पार्लर चा उपयोग केला असता
प्रत्येक जनावरांचे दुग्ध उत्पादन व विविध प्रकारच्या नोंदी ठेवता येतात आणि कमी
वेळात जास्तीत जास्त गायींचे दुध काढता येते. यामुळे मजुरांची बचत होऊन
यांत्रिकीकरनास वाव मिळतो.
Ø जनावरांच्या आरोग्यासाठी ही पद्धत चांगली समजली जाते. दुध काढल्यानंतर
पाईप च्या सहाय्याने दुध थेट बल्क कुलर मध्ये जमा होते. त्यानंतर जमा झालेले दुध पकेजिंग
करता सोयीस्कर होते.
Ø जनावरांची प्रजननक्षमता वाढवण्यासाठी व त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी
एम्ब्रिओ ट्रान्स्फर तंत्रज्ञानाचा वापर करता येतो.
Ø कृत्रिम रेतन पद्धतीचा अवलंब केल्यामुळे संकरीत गायीपासून दुध
उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते.
दुग्धउत्पादनासाठी गायींची निवड :
गायींची दुध
उत्पादनक्षमता ही अनुवांशिक असते. त्यामुळे उत्तम अनुवांशिक गुणधर्म असलेल्या गायी
निवडणे हे किफायतशीर दुग्ध उत्पादनासाठी आवश्यक आहे. गायींच्या वंशावळीची नोंद ही
फक्त संशोधन प्रकाल्पावर ठेवली जाते. शेतकर्यांकडे तशा प्रकारची नोंद असतेच असे
नही. त्यामुळे बाजारामध्ये मिळणाऱ्या जनावरांची निवड, शक्यतो गायींच्या
शरीररचनेच्या सहाय्यानेच खालील दिलेल्या मुद्यांचा विचार करून करावी.
Ø संकरीत गायींचे वय ३-४ वर्षे किंवा दुसरया वेताचे असावे.
Ø गायींची ठेवण त्रिकोणाकृती म्हणजे मागील बाजूने पुढे पाहिल्यास पाचरीसारखा
आकार असावा. त्वचा मऊ व चमकदार असावी. नाकपुढीचा मधला भाग नेहमी ओलसर असावा.
Ø कमरेची हाडे रुंद असावी. त्यामुळे गर्भाची वाढ व प्रसूती व्यवस्थित
होते.
Ø छाती रुंद व घेरदार असावी. पुढील दोन पायात छातीजवळ योग्य व भरपूर
अंतर असावे. बरगड्या रुंद व अर्धगोलाकार असाव्यात. रुंद छातीमुळे हृदय, फुफ्फुसे
यांना मोठी जागा मिळते. दुधाळ गायीमध्ये शेवटच्या तीन बरगड्या दिसाव्यात. मान लांब
व सडपातळ असावी, पाठीचा कणा सरळ व मजबूत असावा त्याला बाक नसावा.
Ø मागील पायात कासेच्या योग्य ठेवणीसाठी भरपूर अंतर असावे. मांड्या आतून
अंतर्वक्र असाव्यात. त्यामुळे कासेची ठेवण योग्य राहते. चारही पायांचे खुर समतोल,
रुंद व सपाट असावे. खुर शक्यतो काळी असावीत.
Ø दुग्धशिरा मोठ्या, फुगीर व नागमोड्या असाव्यात.
Ø गायींची कास मोठी, उठावदार व पोटास चिकटलेली असावी, चारही सड समान आकाराचे,
लांब व चौरसाच्या कोणावर असावेत. दुध काढल्यावर त्वचा पोटाकडे वर सरकायला हवी तसेच
कासेला पुष्कळ घड्या पाडाव्यात. हाताने कास तपासली असता चारही भाग हाताला मऊ
लागावेत. सर्व सड मोकळे असावेत. सड प्रमाणापेक्षा लहान वा मोठे नसावेत. त्याचबरोबर
कास लोंबणारी, ओघळणारी नसावी.
Ø गाय निरोगी असावी तसेच गाय दिसण्यास तरुण, आकर्षक, तरतरीत, डोळे
पाणीदार, त्वचा मऊ व चमकदार असावी. दुधाळ गायींच्या अंगावर चरबी फारशी नसावी.
Ø लवकर पाणवणारी व कोणासही धार काढून देणारी गाय निवडावी.
Ø गायीला स्वताचे दुध स्वत पिणे, दोरी चघळणे, धार काढताना लाथा मारणे,
पान्हा चोरने इत्यादी सवयी नाहीत याची खात्री करून घ्यावी.
Ø गायी १२ महिन्यात विनाऱ्या असाव्यात. व्यायलेली गाय घेताना दुग्ध
उत्पादनाची खात्री करणेसाठी तिचे तीन वेळचे दुध काढावे.
Ø फायदेशीर दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने एका वेतात गायीने साधारणपणे ३०००-३५००
लिटर दुध देणे आवश्यक आहे.
Ø अशाप्रकारे आधुनिकतेची कास धरल्यास उत्पादन खर्च कमी होऊन मालाचा
दर्जाही सुधारतो.
लेखक - श्री. धनंजय गायकवाड
पदव्युत्तर महाविद्यालय महात्मा फुले
कृषि विद्यापीठ, राहुरी (अहमदनगर)
No comments:
Post a Comment