Wednesday, 14 December 2016

रानभाज्यां : औषधी गुणधर्म व उपयोग



रानभाज्यां
शास्त्रीय नाव
कुळ
स्थानिक नावे
१)        
भुईआवळी
Phyllanthus amarus (फायलॅन्थस ऍमरस)
Euphorbiaceae (इफोरबिऐसी)
भुईआवळी
२)        
भारंगी
Clerodendrum serratum (क्‍लेरोडेंड्रम सिरेटम)
Verbenaceae (व्हर्बेनेसी)
भारंगी
३)        
आंबुश
Oxalis corniculata (ऑक्झॅलिस कॉर्निक्युलेटा)
Oxalidaceae ऑक्झॅलिडीएसी
आंबुटी’, आंबोती’, ‘चांगेरी
४)        
टाकळा
Cassia tora (कॅसिया टोरा),
Caesalpinaceae (सिसालपिनेसी).  
तरोटा
५)        
हादगा
Sesbania grandiflora (सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा)
Fabaceae (फॅबेसी)
हादगा
६)        
गोखरू
Tribulus terrestris (ट्रायब्युलस टेरिस्ट्रिस), 
Zygophyllaceae झायगोफायलेसी
सराटा’, काटे गोखरू’, ‘लहान गोखरु’, ‘गोक्षुर
७)        
काटेमाठ
Amaranthus spinosus (ॲमरेन्थस स्पायनोसस)
Amaranthacea (ॲमरेन्थेसी)
कांटा चौलाई
८)        
चुका
Rumex Vesicarius
Polygonaceae पॉलीगोनेसी
चुका, आंबट चुका
९)        
आघाडा
Achyranthes aspera ॲचरॅन्थस ॲस्पेरा
Amaranthaceae ॲमरान्थेसी
आघाडा
१०)     
मायाळू
Basella alba (बेसिला ॲल्बा),
Basellaceae (बॅसिलेसी)
वेलबोंडी
११)     
वसू
Trianthema Portulacastrum ट्राएन्थेमा पोरच्युलेकास्ट्रम
(Aizoaceae )
आयझोएसी
श्‍वेत पुनर्नवा'
१२)     
नळीची भाजी
Ipomoea aquatica आयपोमिया ऍक्वेटिका
कोन्वॉलव्हिलेसिई (Convolvulaceae)
नाळ, नाळी
१३)     
मोरशेंड
Bidens biternata बायडन्स बायटरनेटा
ऍस्टरेसी (Asteraceae).
मोरशेंड
१४)     
कपाळफोडी
 Cardiospermum helicabum कार्डिओस्पर्मम हेलिकॅबम
सॅपीनडिएसी (sapindaceae)
कानफुटी, कर्णस्फोटा


. भुईआवळी :  भाजीचे औषधी गुणधर्म व उपयोग
 १)      या वनस्पतीत "फायलेनथीन' नावाचे द्रव्य आहे. कावीळ झाल्यास भुईआवळी वाटून दुधाबरोबर सकाळ-संध्याकाळ देतात.
 २)      भुईआवळीचा वापर यकृतवृद्धी व प्लीहावृद्धी कमी करण्यास करतात.
 ३)      लघवी कमी होणे, मूतखडा, जंतुसंसर्ग होणे आदी विकारांतही या भाजीच्या सेवनामुळे चांगला गुण येतो.
 ४)      भुईआवळीची भाजी आंबट विषाणूजन्य तापात केला जातो. यकृतातील पाचक स्रावामध्ये बिघाड झाल्यास हिपॅटायटिस - ब (B), तसेच काविळीमध्ये या भाजीचा  उपयोग करतात. 
 ५)      रक्तदाबवृद्धी, चक्कर येणे, या आजारात ही भाजी खाल्ल्याने सुधारणा आढळून येते.
 ६)      फ्ल्यूसारख्या थंडी-तापाच्या आजारात, तसेच वरचेवर सर्दी-खोकला, ताप येणे अशा लक्षणांत ही भाजी नियमितपणे खावी.
 ७)      भुईआवळीची पाने, कोवळी खोडे व फांद्या भाजी करण्यासाठी वापरतात.
. भारंगी :  भाजीचे औषधी गुणधर्म व उपयोग
 १)     भारंगीचे मूळ ज्वर किंवा कफ असलेल्या रोगात देतात. दमा, खोकला, सर्दी व घशातील शोष या विकारांत भारंगमूळ प्रामुख्याने वापरतात.
 २)     भारंगीच्या पानांची भाजी दमा होऊ नये म्हणून आजही कोकणात वापरतात. याच्या कोवळ्या पानांची भाजी चवीला रुचकर असते. सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारांत या भाजीचा उपयोग होतो.
 ३)     पोट साफ होण्यासाठीही ही भाजी उपयुक्त ठरते. कारण ती पाचक आहे.
 ४)     पोटात कृमी झाल्यास पाने शिजवून, त्यातील पाणी गाळून प्यावे. पोट जड असणे, तोंडाची चव गुळचट असणे, तोंडात चिकटा जाणवणे, सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती किंचित सूज जाणवणे, अशा वेळी भारंगीच्या पानांची भाजी हिंग व लसणाची फोडणी देऊन बाजरीच्या भाकरीबरोबर खावी.
 ५)     भारंगीच्या फुलांचीही भाजी करतात.
. आंबुशी :  औषधी गुणधर्म व उपयोग
१)     आंबुशीला इंग्रजीमध्ये इंडियन सॉरेल असे म्हणतात.
२)     आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे. ही वनस्पती पचनास हलकी असून, चांगली भूकवर्धक आहे. ही रोचक, दीपन, पित्तशामक, दाहप्रशमन, रक्तसंग्राहक, शोथघ्न आहे.
३)     आंबुशीच्या अंगरसाने धमन्यांचे संकोचन होऊन रक्तस्राव बंद होतो. कफ, वात आणि मूळव्याध यात आंबुशी गुणकारी आहे. ही वनस्पती आमांश, अतिसार, त्वचारोग आणि चौघारे तापात उपयुक्त आहे. घृत गुदभ्रंश, योनिभ्रंशात उपयोगी.
४)     धोतऱ्याने विष चढल्यास आंबुशीचा रस उतार म्हणून देतात.-
. टाकळा : भाजीचे औषधी गुणधर्म व उपयोग
टाकळ्याच्या पानांत विरेचन द्रव्य व लाल रंग असतो. या वनस्पतीत एमोडीनग्लुकोसाइड आहे. टाकळा आनुलोमिक असून, याची क्रिया त्वचेवर होते. टाकळा सर्व प्रकारच्या त्वचारोगांत देतात. पाने व बियांमध्ये क्रायझोजेनिक आम्लअसून, ते त्वचारोगात मौल्यवान आहे.
टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो. त्याचबरोबर इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचाविकारही कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो. टाकळ्याची भाजी पचायला हलकी, तिखट, तुरट, पित्तकर आहे व मलसारक आहे.
. हादगा :   भाजीचे औषधी गुणधर्म व उपयोग :
हादग्याची फुले चवीला थोडी कडवट, तुरट असतात. त्याचा पाक तिखट असतो. फुले गुणाने थंड आहेत, त्यामुळे त्रिदोषांपैकी वातदोष कमी होण्याकरिता, तसेच कफ व पित्तदोषही साम्यावस्येत आणण्यासाठी हादग्याच्या फुलांच्या भाजीचा चांगला उपयोग होतो.
 १)     चार-चार दिवसांनी थंडी वाजून येणाऱ्‍या तापावर हादग्याच्या फुलांची भाजी उपयुक्त आहे.
 २)     भूक लागत नसल्यास, पोट साफ होत नसल्यासही हादग्याच्या भाजीने चांगला गुण येतो.
 ३)     ज्या स्त्रियांची पाळी अनियमित होते, अंगावरून कमी जाते, पाळीच्या दिवसांत कंबर, ओटीपोटी दुखते अशा तक्रारी या भाजीच्या सेवनाने कमी होतात.
 ४)     भाजीचे नियमित सेवन केल्यास रातांधळेपणा रुग्णाचा त्रास कमी होतो.
 ५)     हादग्याच्या फुलांच्या भाजीने जेवणात रुची निर्माण होते. शेंगांचीही भाजी करतात.
. गोखरू :  भाजीचे औषधी गुणधर्म व उपयोग
 १)     गोखरूचे मूळ व फळे औषधात वापरतात. गोखरूचे मूळ दशमुळातील एक घटक आहे. गोखरू स्नेहन, वेदनास्थापन, मूत्रजनन, संग्राहक व बल्य आहे. गोखरू शीतल असून, मूत्रपिडांस उत्तेजक आहे.
 २)     गोखरुची फळे मूत्राच्या विकारांवर, लैंगिक आजारपणात अत्यंत उपयोगी आहेत. फळांचा काढा संधिवातावर आणि मूत्राशयाच्या विकारावर उपयोगी आहे.
 ३)     गर्भाशयाची शुद्धी होऊन वांझपणा नाहीसा होण्यासाठी गोखरू वापरतात. धातुविकार व प्रदर या विकारांवर गोखरूची फळे तुपात तळून त्याचे चूर्ण करून गाईचे तूप व खडीसाखर घालून देतात.
गोखरूची पाने व कोवळी खोडे भाजीसाठी वापरतात. यामुळे मूतखडा होण्याची प्रवृत्ती थांबते. कारण एकदा मूतखडा झाला, की वारंवार होत राहतो. हे होऊ नये म्हणून गोखरूची भाजी उपयोगी पडते. प्रमेहासारख्या व्याधीतही गोखरूची भाजी उपयुक्त ठरते. हृदयरोगांना मज्जाव करते. छाती भरली असल्यास ती कमी करण्यासाठी गोखरूची कोरडी भाजी देतात. कंबरदुखी, अंगदुखी यासाठीसुद्धा गोखरूची भाजी उपयोगी आहे.
. काटेमाठ :  भाजीचे औषधी गुणधर्म व उपयोग
१)  काटेमाठ शीतल, मूत्रजनन, स्तन्यजनन, दीपक, संसर्गरक्षक, सारक, ज्वरशामक गुणधर्मांची आहे.
२)  काटेमाठ गर्भाशयास शक्ती देणारी आहे. काटेमाठामुळे गर्भाशयशूल कमी होतो आणि रक्त वाहणे बंद होते. गर्भपात होण्याची सवय काटेमाठाने कमी होते.
३)  काटेमाठाची कोवळी पाने व कोवळ्या फांद्या भाजी करण्यासाठी वापरतात. काटेमाठाची भाजी पाष्टिक असून, पचनास हलकी आहे. बाळंतिणीच्या खाद्यात भाजी असल्यास तिच्या अंगावरील दूध वाढण्यास उपयुक्त ठरते.
४)  अतिरजस्राव, श्वेतप्रदर या स्त्रियांच्या विकारांत ही भाजी खाल्ल्याने गुण येतो. गर्भाशय शैथिल्य, सूज यावरही काटेमाठची भाजी उपयोगी पडते. गरोदरपणात ही भाजी वरचेवर खाल्ल्याने गर्भपात होण्याचे टळते व गर्भाचे नीट पोषण होते.
. चुका : भाजीचे औषधी गुणधर्म व उपयोग
१) भाजी तयार करण्यासाठी चुक्याची पाने, कोवळ्या फांद्या व खोड वापरतात.
२)           ही भाजी आंबट-गोड असून, वातदोष कमी करते. पचनास हलकी असून, जेवणास चव आणणारी आहे. भूक लागत नसल्यास किंवा भूक लागूनही जेवण जात नसल्यास चुक्याच्या भाजीमुळे भूक लागते, जेवण जाते आणि पचनक्रियाही सुरळीत होते. ही भाजी थंड असल्याने हातापायांची जळजळ, मूत्रमार्गाचा दाह, आदी उष्णतेच्या विकारात भाजीचा उपयोग होतो.
३)           ज्यांना आतड्यांमध्ये, जठरामध्ये गरम दाह जाणवतो व उलट्या होतात, अशा रुग्णांनी चुक्याची भाजी नियमितपणे खावी.
४)           चुका भाजी वांग्याच्या भाजीत मिसळून केल्यास अतिरोचनीम्हणजेच अतिशय रुचकर लागते, म्हणून चुक्याचे पर्यायी नाव रोचनीअसे आहे.
. आघाडा : भाजी औषधी उपयोग :
आघाडा या वनस्पतीची मुळे, पाने, फुले, फळे (पंचांग) औषधात वापरतात. आघाड्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. ही भाजी पाचक असून, लघवीस साफ होण्यासाठी उपयोग होतो. या भाजीच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. शरीरातील मेद कमी करण्यासाठी आघाड्याची कोरडी भाजी उपयुक्त आहे. या भाजीने मूळव्याधीच्या तक्रारी, गुदभागी वेदना, खाज इत्यादी कमी होण्यास मदत होते.
१०. मायाळू : इंग्रजीत मायाळूला इंडियन स्पिनॅचमलबार नाईट शेडअशी नावे आहेत.
१)     रक्ताची किंवा पित्ताची उष्णता अतिशय वाढल्यास मायाळूची भाजी देतात. गुणधर्माने ही भाजी थंड स्वरूपाची आहे. मायाळूची भाजी पालकाप्रमाणे जिरण्यास हलकी आहे.
२)     सांध्यांच्या ठिकाणच्या वेदना व सूज कमी होण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे.
३)     रक्तविकारात वाढलेली रक्तातील उष्णता या भाजीमुळे कमी होते व रक्तशुद्धी होते. त्यामुळे त्वचाविकारही कमी होतात.
४)     ही वनस्पती तुरट, गोडसर, स्निग्ध, निद्राकार, मादक, कामोत्तेजक, चरबीकारक, विरेचक व भूकवर्धक आहे. मायाळू पित्तशामक असून त्वचारोग, आमांश, व्रण यांवर उपयोगी आहे. ही कफकारक, मादक, पौष्टिक व ज्वरनाशक आहे.
५)     मायाळूचा अंगरस पित्त उठल्यानंतर अंगावर चोळतात. यामुळे आवा व खाज कमी होते.
६)     परमा रोगामध्ये पानांचा रस देतात.
७)     पानांचा लगदा केस तूट आणि गळू लवकर पिकण्यासाठी बांधतात.
८)     मायाळू शोधशामक आणि मूत्रवर्धक आहे. मायाळूच्या पानांचा रस लोण्याबरोबर मिसळून भाजण्यावर व गरम पाण्याने पोळण्यावर आरामदायक उपाय आहे.
९)     या वनस्पतीच्या खोडापासून निघणारे श्‍लेष्मल द्रव वारंवार डोके दुखण्यावर प्रसिद्ध उपाय आहे.
११. वसू :  ही वनस्पती शोथशामक औषधी म्हणून प्रसिद्ध आहे.
१)     वसूच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.
२)     वसूची भाजी दीपन, वातहर आणि कफघ्न आहे. वसूची भाजी खोकला व दमा या विकारात उपयुक्त आहे.
३)     शरीरातील वात कमी करण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो.
४)     यकृताचे विकार, त्वचारोग, कुपचन यांमध्ये वसूची भाजी अत्यंत गुणकारी आहे.
१२. नळीची भाजी :   ( इंग्रजी - वॉटर स्पिनॅच (water spinach) , हिंदी – कलमीसाग)
१)     ही वनस्पती दुग्धवर्धक व कृमीनाशक गुणधर्माची आहे. वातानुलोमक असून, दाह कमी करते.
२)     पांढरे डाग, कुष्ठरोग, पित्तप्रकोप आणि तापात ही वनस्पती उपयुक्त आहे, तसेच कफ व वातवर्धक आहे.
३)     कावीळ, श्‍वासनलिका दाह व यकृतविकारात या वनस्पतीचा वापर करतात.
४)     स्त्रियांना मानसिक आणि सामान्य दुर्बलता आलेली असल्यास ही वनस्पती शक्तीवर्धक म्हणून देण्याची प्रथा आहे.
५)     आर्सेनिक आणि अफूच्या विषबाधेत वांतीकारक म्हणून या वनस्पतीचा वापर करतात.
६)     पाने ज्वरातील प्रलापात निर्देशित करतात.
७)     सुकविलेला अंगरस जुलाब झाल्यास देतात.  नागिणीच्या उपचारात ही वनस्पती वापरली जाते.
१३. मोरशेंड :   
१)     मोरशेंड वनस्पतीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.  संधिवाताच्या विकारात या भाजीचा उपयोग होतो.
२)     या भाजीच्या सेवनामुळे रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण कमी होऊन सांध्यांची सूज कमी होते.
३)     रक्तातील उष्णता कमी होऊन रक्तदृष्टीजन्य विकार या भाजीमुळे कमी होण्यास मदत होते.
४)     तरुणांतील गुप्तरोग व स्त्रियांमधील श्‍वेतप्रदर या विकारात मोरशेंड भाजीचा चांगला उपयोग होतो.
१४. कपाळफोडी : भाजीचे औषधी गुणधर्म
कपाळफोडीच्या पानांची भाजी करतात. जीर्ण आमवातामध्ये पानांची भाजी खाण्याची प्रथा आहे. ही भाजी आमवात या संधिवाताच्या प्रकारात गुणकारी आहे. पोट गच्च होणे, मलाविरोध यामुळे अंग जखडल्यासारखे वाटणे अशा विकारात कपाळफोडीच्या भाजीने चांगला गुण येतो. स्त्रियांची मासिक पाळी नियमित होत नसेल, अंगावरून कमी प्रमाणात जात असेल तर या भाजीचा चांगला उपयोग होतो. परमा तसेच गुप्तरोगामध्ये या भाजीचा उपयोग होतो.  आधुनिक शास्त्रानुसार कपाळफोडीच्या पानात अँटिबायोटिक व अँटिपॅरासायटिक तत्त्वे असल्याने जुनाट खोकला (chronic bronchitis) यावर तसेच छाती भरणे या विकारातही कपाळफोडीची भाजी उपयुक्त आहे.

लेखक :-  श्री विक्की एन. नंदेश्वर (पी. एच. डी. कृषि) डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ 
         अकोला.

No comments:

Post a Comment