पांढरे सोने म्हणून ओळखणाऱ्या जाणाऱ्या कपाशी
या पिकाच्या कमी उत्पादन येण्याच्या विविध कारणांपैकी किडींमुळे होणारे नुकसान हे
महत्वाचे आहे. सर्वसाधारणपणे ४० ते ५० टक्के नुकसान किडींमुळे होते. म्हणून
किडींचे योग्यवेळी प्रभावी एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी किडींची
ओळख, प्रादुर्भावाची
वेळ, नुकसानीचे स्वरूप, आर्थिक नुकसानीचे स्वरूप, आर्थिक नुकसानीची मर्यादा, मित्र किटक, तव्दतच
एकात्मीक कीड व्यवस्थापनाची माहिती असणे आवश्यक आहे.
बीटी कपाशीवरील
महत्वाच्या रस शोषक किडी
१) मावा २) तुडतुडे ३) फुलकिडे ४) पांढरी ५)
कोळी
१) तुडतुडे - तुडतुड्यांचे
प्रौढ व पिल्ले पानाच्या मागील बाजूने राहून रस शोषण करतात, त्यामुळे सुरवातीला पानाच्या कडा पिवळसर पडतात, पाने आकसतात. त्यानंतर कडा तपकिरी किंवा लालसर
होतात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास झाडाची संपूर्ण पाने तपकिरी होतात. या
किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होतो. सर्वांत जास्त प्रादुर्भाव ऑगस्टचा शेवटचा
आठवडा ते सप्टेंबरचा दुसरा आठवडा या कालावधीत आढळून येतो. अधूनमधून होणारा हलकासा पाऊस आणि ढगाळ वातावरण
या किडीच्या वाढीला पोषक आहे. कपाशीची उशिरा पेरणी
आणि नत्रयुक्त खतांचा गरजेपेक्षा जास्त वापर या किडीच्या वाढीस मदत .
२) फुलकिडे - प्रौढ फुलकिडे आणि
पिल्ले कपाशीच्या पानामागील भाग खरवडून त्यातून निघणारा रस शोषण करतात.
प्रादुर्भावग्रस्त भागातील पाने शुष्क होतात. तो भाग प्रथम पांढुरका आणि नंतर
तपकिरी होतो, त्यामुळे पाने व
कळ्या आकसतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने कडक होऊन फाटतात. फुलकिडे पावसाळ्याच्या शेवटी आणि लांब उघाड
पडली तर मोठ्या संख्येत वाढतात. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात प्रादुर्भाव वाढतो. मागील चार- पाच वर्षांपासून फुलकिड्यांचा
प्रादुर्भाव बीटी कपाशीवर जास्त प्रमाणात वाढत आहे.
३) पांढरी माशी – पांढऱ्या माशीचे
प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करतात. अशी पाने कोमेजतात.
प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने लालसर ठिसूळ होऊन शेवटी वाळतात. पिल्ले त्यांच्या शरीरातून गोड चिकट द्रव बाहेर
टाकतात, त्यामुळे संपूर्ण
झाड चिकट व त्यावर बुरशी वाढून काळसर होते. त्यामुळे पानाच्या अन्न निर्माण
करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊन झाडावर विपरीत परिणाम होतो, त्याचबरोबर काही विषाणूंचा प्रसारसुद्धा या
माशीमुळे होतो. प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या
आठवड्यापासून सुरू होतो. नंतर नोव्हेंबर महिन्यात अधिकतम प्रादुर्भाव दिसतो. सध्या बीटी कपाशीवर पांढऱ्या माशीचा
प्रादुर्भाव वाढत आहे. सुरवातीच्या काळातील रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेकी वापर हे
प्रमुख कारण आहे, यामुळे पांढऱ्या
माशीचा कपाशीवर वारंवार पुनर्उद्रेक होत आहे.
४) मावा - माव्याचे प्रौढ व
पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने आणि कोवळ्या शेंड्यावर समूहाने राहून त्यातील रस
शोषण करतात, अशी पाने आकसतात व
मुरगळतात, त्यामुळे झाडाची
वाढ खुंटते. माव्याने शरीरातून
बाहेर टाकलेल्या चिकट गोड द्रवामुळे बुरशीची वाढ होऊन पाने काळसर होतात. पिकाच्या शेवटच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास
कापसाची बोंडे चांगली उमलत नाहीत, तसेच काही
विषाणूंचा प्रसार माव्यामार्फत केला जातो.
मावा
या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपावस्थेत आणि शेवटच्या अवस्थेत आढळतो. कोरडवाहू कपाशीवर सर्वसाधारणपणे जुलैच्या
दुसऱ्या आठवड्यापासून प्रादुर्भाव सुरू होतो. सर्वांत जास्त प्रादुर्भाव जुलैचा शेवटचा आठवडा
ते ऑगस्टचा दुसरा आठवडा आणि पिकाच्या शेवटी डिसेंबर- जानेवारी महिन्यात आढळून
येतो. रिमझिम पाऊस आणि
अधिक आर्द्रता या किडीच्या वाढीला पोषक असते;
परंतु
जोराचा पाऊस झाल्यास त्यांची संख्या कमी होते.
एकीकृत (एकात्मिक)
कीड व्यवस्थापन
एकीकृत कीड व्यवस्थापनात मशागतीय पध्दती उदा. जमिनीची नांगरणी, योग्य वेळेवर पेरणी, खताचा योग्य वापर, प्रतिकारक वाणाची निवड महत्वाच्या आहेत. बीटी कपाशीवरील किडींच्या व्यवस्थापनासाठी केवळ रासायनिक कीटकनाशकांचाच वापर न करता मशागतीय, यांत्रिक, जैविक पद्धतीचा वापर करावा. .

कीड सर्वेक्षण
पध्दत
१. किडींच्या संख्येची प्रत्यक्ष मोजणी
कपाशीच्या शेतातील वेगवेगळ्या ठिकाणाची १०-१५ झाडे निवडावीत. रस शोषण करणाय्रा किडींसाठी झाडावरील खालचे, मधले आणि वरचे पान घेऊन त्यावर आढळणाय्रा मावा, तुडतुडते, फुलकिडे, पांढरीमाशी (प्रोढ) यांची संख्या तर पूर्ण झाडावरच्या लेडी बर्ड बिटल, क्रायसोपा (अंडी,अळ्या,प्रौढ) यांची नोंद घ्यावी.

आर्थिक नुकसानीची पातळी:
कीड
|
आर्थिक नुकसानीची पातळी
|
तुडतुडे
|
२ ते ३ पिल्ले/ पान
|
फुलकिडे
|
१० फुलकिडे/पान
|
पांढरी माशी
|
८ ते १० प्रौढ माशा किंवा १० पिल्ले/पान
|
मावा
|
१५ ते २०% प्रादुर्भावग्रस्त झाडे किंवा १० मावा/पान
|
एकीकृत
कीडव्यवस्थापण
१. पेरणीपूर्वी- हंगाम संपल्यानंतर काडीकचरा वेचून नष्ट करावा. उन्हाळ्यात खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीतील किडींच्या अवस्था वरती येवून उन्हामुळे मरतील किंवा पक्षी त्यांना वेचून खातील.
१. पेरणीपूर्वी- हंगाम संपल्यानंतर काडीकचरा वेचून नष्ट करावा. उन्हाळ्यात खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीतील किडींच्या अवस्था वरती येवून उन्हामुळे मरतील किंवा पक्षी त्यांना वेचून खातील.
२. कपाशीची पेरणी विस्तृत क्षेत्रावर ठराविक
अल्प कालावधीत संपवावी त्यामुळे किडींना अखंड अन्नपुरवठा होणार नाही.
३. पेरणीसाठी फक्त शिफारीस केलेल्या मर्यादित वाणांचाच अवलंब करावा.
४. कपाशीच्या पिकामध्ये मका, चवळी या पिकाच्या चारस ओळीनंतर एक ओळ आणि बांधावर एरंडी लावावी म्हणजे परभक्षी व परोरजीवी किटकांचे संवर्नास मदत होते.
५. कपाशीची पेरणी योग्य अंतरावर करावी, जेणेकरून दोन पिकामधील अंतर योग्य ते राहील.
६. मृदा परीक्षणाच्या आधारावर रासायनिक खताचा शिफारशीत वापर करावा. नत्र अधिक देऊ नये. जेणे करून कपाशी पिकाची अनावश्यक कायक वाढ होणार नाही व पिक दाटणार नाही त्यामुळे पर्यायाने पिकावरील कीड कमी राहील.
७. ओलीताखालील कपाशीला पेरणीचे वेळी प्रत्येक फुलीवर फोरेट १० टक्के दाणेदार १-१.५ ग्रॅम या प्रमाणात जमिनीत टाकावे. बियाण्याचा फोरेट सोबत प्रत्यक्ष संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. अथवा इमिडॅक्लोप्रिड ७० डब्लु एस १० ग्रॅम/किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करून पेरणी करावी त्यामुळे सुरवातीला 15 ते 20 दिवस रस शोषण करणाऱ्या किडीपासून संरक्षण मिळते.
८. पांढय्रा माशीचे व्यवस्थापना करिता पिवळ्या रंगाचे चिकट सापळे उभारावेत.

९. रासाचनिक किटकनाशकाचा शिफारशीत मात्रेचाच अवलंब
करावा, तसेच एकाच
कीटकनाशकाचा सतत वापर करू नये.
१०. शेवटची वेचणी झाल्याबरोबर कापसाचे पीक घेऊ नये.
११. फरदळी कापसाचे पीक घेऊ नये.
१२. प्रर्हाटीचे ढीग शेतात न लावता गावाजवळ लावावे आणि पावसाळ्यापूर्वी त्याचा जळण्यासाठी
१०. शेवटची वेचणी झाल्याबरोबर कापसाचे पीक घेऊ नये.
११. फरदळी कापसाचे पीक घेऊ नये.
१२. प्रर्हाटीचे ढीग शेतात न लावता गावाजवळ लावावे आणि पावसाळ्यापूर्वी त्याचा जळण्यासाठी
वापर करावा.
१३. धसकटे, पालापाचोळा गोळा करून जाळावा.
१४. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करावी.
१३. धसकटे, पालापाचोळा गोळा करून जाळावा.
१४. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करावी.
१५. कपाशीवरील मित्र
कीटक :
अ)क्रायसोपा : क्रायसोपाची अळी
करड्या-तांबुस रंगाची असते. अळीला दोन मोठ्या नाग्यासारखे दात असतात. क्रायसोपाची
अळी मावा, तुडतुडते,
पांढरीमाशी,
किडींची अंडी तसेच
लहान अळ्यांवर जगते. क्रायसोपाची अंडी पोपटी रंगाची असून त्यांना केसाप्रमाणे लांब
तंतु असतो आणि त्याद्वारे अंडी पानावर टाकलेली असतात. क्रायसोपाची हेक्टरी १०,००० अंडी
याप्रमाणात कपाशीचे पिक ४० दिवसाचे झाल्यानंतर ३० दिवसाच्या अंतराने दोन वेळा
सोडावे.
ब) लेडीबर्ड बीटल : प्रोढ भुंगा
तुरीच्या दाण्यासारखा पण खालुन चापट व वरून फुगीर असतो. भुंगा रंगाने पिवळसर,
बदामी किंवा लालसर
असून त्याच्या समोरच्या पंखावर काळ्या रेषा किंवा ठिपके असतात. अंडी रंगाने पिवळसर
व आकाराने लांबोळकी असून समुहामध्ये पण उभी घातलेली असतात. अळी ६ ते ७ मि.मी. लांब
असून रंगाने करडी व त्यावर पांडुरके ठिपके असतात. प्रोढ भुंगे आणि त्यांच्या अळ्या
प्रामुख्याने मावा किंडींवर तसेच विविध प्रकारच्या मृदुकाय किडींवर जगतात.
लेडीबर्ड बीटलचे
कोष पानावर, शेंड्यावर
चिकटून असतात
क)सिरफीड माशी . सिरफीड माशी घरात
आढळणाय्रा माशीसारखीच असुन तिच्या पाठीवर लाल-पिवळे व काळे पट्टे असातात. माशीचे
डोके लालसर रंगाचे असते. सिरफीड माशीची अंडी रंगाने पांढरी आणि आकाराने लहान व
लांबोळी असतात.ह्या माशीच्या अळ्या रंगाने हिरवट व त्यांच्या तोंडाकडचा भाग टोकदार
असतो. सिरफीड माशी मावा किडींचा महत्वाचा भक्षक कीटक आहे. सिरफीड माशीची एक अळी
दिवसभरतात साधरणतः १०० मावा फस्त करते माव्या व्यतिरिक्त ह्या अळ्या किडींची अंडी
व अळ्यांवर सुध्दा जगतात.
१६. रासायनिक
किटकनाशकाचा
वापर फक्त किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच करावा. किडींनी आर्थिक
नुकसानीची पातळी ओलांडताच खालील कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून वारणी करावी.
Ø डायफ़ेन्थियुरोन ५०
टक्के डब्ल्यु पी – १२ ग्राम किंवा
Ø थायमिथोक्साम २५
टक्के डब्ल्यु जी- २ ग्राम किंवा
Ø फिप्रोनील ५ टक्के
एस सी - २० मिली किंवा
Ø ईमीडाक्लोप्रीड
१७.८ टक्के प्रवाही – २.५ मिली
कपाशीवरील
किडीचे नियमीत सर्वेक्षण, परोपजीवी/परभक्षी
किटकांचे संवर्धन, जैविक घटकांचा
वापर आणि गरजेनुसार रासायनिक किटकनाशकांचा अवलंब केल्यास कपाशीवरील किडीचे प्रभावी, स्थाई आणि कमी खर्चात व्यवस्थापन होते.
लेखक –
किरण बुधवत (सहाय्यक
प्राध्यापक),
श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती
No comments:
Post a Comment