आज देश्यामध्ये व देश्याबाहेर मांसा ची मागणी फार मोठ्या प्रमाणवर
वाढत आहे. त्यासाठी आपल्या देश्यात मांस निर्मितीसाठी शेलीपालनाला जास्त प्राधान्य
देता येणे शक्य आहे. शेळी ही रवंथ करणाऱ्या छोट्या प्राण्यामध्ये मोडली जात असून
ती शेतातील गवत, तन, ध्यान पिकांचे कापलेले खुंट, झाडपाला, झाडांच्या वाळलेल्या
किंवा ओल्या शेंगा, पावसानंतर जमिनीच्या पृष्ठ भागवर उगवणारे गवत इ. वर जगून
स्वत:चे पोट भरतेच परंतु खाल्लेल्या आन्न्चे रुपांतर दुधात व मांसात करते शिवाय
शेतकऱ्यांना शेतीसाठी उत्तम खत देते. त्यचप्रमाणे मांसासाठी कत्तल केल्यानंतर
अखाद्य भाग म्हणजे हाडे, शिंगे, खुरे, कातडी यांचाही उपयोग होतो. उदा. हाडापासून
भुकटी करून तिचा उपयोग अंड्यावरील कोंबड्याचा खाद्यत कॅल्शियमचा पुरवठा व्हावा
म्हणून करण्यात येतो. शिंगे आणि खुरे यांचा उपयोग डिंकयुक्त पदार्थ तयार करण्यसाठी
केला जातो. आश्या उपयोगी प्राण्याच्या व्यस्थापन व आहाराविषयी लक्ष देणे गरजेचे
आहे. व्यस्थापनाचा भाग बह्तांशी शेतकऱ्यांनच्या हातात आहे म्हणजे त्यात
परावलंबित्व कमी प्रमाणात आहे. परंतु आहार विषयक विचार केल्यास परावलंबित्व हे
मोठ्या प्रमाणावर आहे. असेच आपणास दिसते. हे परावलंबन बह्तांशी निसर्गाशीच निगडीत
असल्याने निसर्ग नियमाप्रमाणे वाढणा-या वनस्पतींचा उपयोग आपणास अश्या प्रकारे करून
घ्यावयास पाहिजे की, जेणे करून शेळ्यांचे पोट आपण वर्षभर व्यवस्तीत भरू शकू.
ऋतुमनप्रमाणे
वर्षाचे तीन हंगाम पडतात
१.
खरीप हंगाम: जुलै ते ओक्टोंबर ३. उन्हाळी हंगाम: मार्च ते जून
२.
रब्बी हंगाम: नोहेंबर ते फेब्रुवरी
पावसाळयात खरीप
हंगामचा विचार केल्यास पाऊस जर व्यवस्थीत
झाला तर चा–याचे प्रमाण समाधानकारक राहते आणि हया काळात कोणत्याही प्रकारची
उपासमार होत नाही. तथापी रब्बी हंगाम म्हणजे हीवाळयात थोडया
प्रमाणावर व उन्हाळयात मात्र बर्याच मोठ्या कालावधी शेळयांना भरपूर च–यापासून
वंचित राहावे लागते. आशा वेळी शेतक-यांना झडपाल्याचा आधार घ्यावा लागतो. तरीही
झडपालयांना सुदधा मर्यादा पडतात. कोणताही झाडपाला, कोणता चांगला, कोणता वाईट, कोणत्या स्थितीत निकृठ हे ठरविता येत
नाही. त्यामुळे शेळी खाईल तोच झाडपाला चांगला आसे अनुमान आपण काढतो. त्या मुळे
शेळीस पुरेश्या प्रमाणात अन्न घटक मिळतातच आसे खात्रीने सगता येत नाही. अश्या वेळी
शेतक–यानां वेगवेगळया झाडपाल्यातील शेळीस लागणारे अन्नघटका चे प्रमाण काय आहे.
कोणकोणत्या महिन्यात झाडस हिरवा पाला व चिकावरच्या हिरव्या शेंगा आसतात, शेळया असा झाडपाला जास्तीत जास्त किती खाऊ शकतात ई. माहिती आसल्यास आणि
त्या नुसार झाडपाला निवडून तो शेळयानां खाऊ घतल्यास आवशक्य तो पोषण आहार मिळून
त्यांची अन्न आभावी आबाळ होणार नाही.
१. बाभुळ: याचे दोन प्रकार
आहेत, एक छत्रीसारखी सावली देणारी (साधी बाभुळ) व दुसरी सरळ खरट्यासारखी
वाढणारी (रामकाठी), हे झाड साधारण १५ ते १८ मी ऊंच वाढते.
खारट व चोपण जमिनीत सुद्धा याची समाधानकारक होते. या झाडाची पाने व शेंगा शेळ्या
आवडीने खातात.
२.
सुबाभुळ: हे दल वर्गातील झाड असून पचनीय
३.
वेडीबाभुळ: हा वृक्ष बभळीच्या
कुळातील असून त्याच्या शेंगा शेळ्या आवडीने खातात.
४.
खैर: खैराची झाडे दुष्काळी भागात डोंगर उतरवर, शेताच्या
बांधावर सर्वेत्र येतात. सदैव हिरवेगार असणारे हे झाड उंच वाढते. यांच्या पानांची रचना समोरासमोर असून आकाराने ती बभळीच्या पानासारखी
दिसतात.
५.
बोर: हे सर्वांच्या परिचयाचे झाड असून त्यंची
पाने म्हणजे शेळयांचे उत्तम खाद्य आहे.
६.
शेवगा: शवग्याचा पाला शेळ्या आवडीने खातात.
लेखक - श्री. धनंजय गायकवाड
पदव्युत्तर महाविद्यालय महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
(अहमदनगर)
No comments:
Post a Comment