मागील व या वर्षी असलेल्या दुष्काळामुळे फार कमी शेतकऱ्यांकडे
बेण्यासाठी ऊस शिल्लक राहिलेला आहे, तसेच जो ऊस शिल्लक आहे त्यातून निरोगी व
दर्जेदार बेणे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत.
बऱ्याचश्या शेतकऱ्यांना बाहेरून बेणे खरेदी करावे लागणार आहे, अश्यावेळी खालील
बाबींची माहिती असणे गरजेचे आहे. ऊस
लागवडीसाठी
शेतकर्यांची
आतापासूनच
धावपळ
सुरू
झाली
आहे.
सध्याची
पाण्याची
व बेण्याची उपलब्धता
व
जमिनीचा
प्रकार
पाहून
ऊस
लागवडीसाठी
नियोजन
करावे.
उस
या
नगदी
पिकाच्या
चांगल्या
उत्पादनासाठी
उत्तम
जातीची
निवड,
दर्जेदार
बेण्याची
उपलब्धता,
रोप
पध्दतीने
लागवड,
सिंचनासाठी
ठिबकने
पाणी
आणि
संतुलित
खत
व्यवस्थापन
या
गोष्टी
प्रामुख्याने
गरजेच्या
आहेत.
हंगामनिहाय
शिफारशीत
जास्त
उत्पादन
देणाऱ्या
जातींची
निवड
करावी.
लागवडीपूर्वी
बेण्यास
बीजप्रक्रिया
अत्यंत
महत्त्वाची
आहे.
रुंद
सरी
(पट्टा) पध्दतीने
लागवड
करावी.
जमिनीच्या
उभ्या व आडव्या नांगरटीनंतर
कल्टीवेटरच्या
साह्याने
मशागत
करावी.
नंतर
लोड
(मैंद) फिरवून
जमीन
सपाट
करावी.
रिजरच्या
साह्याने
जमिनीच्या
प्रकारानुसार
९०,
१००
किंवा
१२०
सें.मी.
अंतरावर
सऱ्या
पाडून
शेत
खोऱ्याच्या
(फावड्याच्या) साहाय्याने
बांधून
घ्यावे.
लांब
सऱ्यांमुळे
शेतात
पाणी
चांगले
देता
येते.
रान
बांधनिनंतर
लागण
करावी.
उसाची
लागण
पुढील
दोन
पध्दतीनी
करता
येते....
१) ओली
लागण -
हलक्या
मध्यम
जमिनीत
करावी.
२) कोरडी
लागण - भारी
जमिनीत
करावी.
दोन
डोळ्यांच्या
टिपरीचा
वापर
करावा.
पहिल्या
२-३
पाण्याच्या
हलक्या
पाळ्या
दयाव्यात.
त्यामुळे
कांड्या
उघडया
पडून
नांग्या
पडणार
नाहीत.
बेणे
योग्य
खोलीवर
लावल्यास
१०
ते
२०
दिवसांत
उगवण
पूर्ण
होते.
ऊस लागवडीचे
तीन
हंगाम
आहेत.
आपणास
कोणता
हंगाम
योग्य
आहे
त्यानुसार
उसाची
लागवड
करावी.
१) आडसाली
: जुलै-ऑगस्ट
- १८ महिने
२) पूर्वहंगामी
: सप्टेंबर
– नोव्हेंबर - १४
महिने
३) सुरू
: जानेवारी
– फेब्रुवारी - १३
महिने
पाण्याची
उपलब्धता
पाहून
उसाची
लागवड
करावी.
सुरू
हंगामात
उसाचे
सरासरी
उत्पादन
१२८
मे.
टन,
तर
साखरेचे
उत्पादन
१९.७४
मे.
टन/हे.
परियंत
मिळू
शकते.
पूर्व
हंगामात
उसाचे
सरासरी
उत्पादन
१३९
मे.
टन/हे.,
तर
साखर
उत्पादन
२०.०७
मे.
टन/हे.
परियंत
मिळू
शकते.
बेणे
निवड :
ऊस उत्पादनात
ऊस
बियाण्याला
अनन्यसाधारण
महत्व
आहे.
चांगला
ऊस
उत्पादनासाठी
उसाचे
बियाणे
ही
एक
गुंतवणूक
आहे.
बेणे
निवडताना
पुढील
गोष्टी
लक्षात
घ्याव्यात.
१) योग्य
जातीचे
भेसळ
नसलेले
बियाणे
रोपवाटीकेमधून
निवडावे.
ऊस
लागणीसाठी
स्वतच्या
शेतात
बेणे
प्लॉट
तयार
करावा
किंवा
ऊस
संशोधन
केंद्र,
कृषी
विद्यापीठ,
साखर
कारखान्यांच्या
बेणे
मळ्यातील
बियाणे
लागवडीसाठी
वापरावे.
२) उसाचे
बेणे
जाड,
रसरशीत
व
जोमदार
असावे.
प्रत्येक
कांडीवर
योग्य
वाढ
झालेला
एक
डोळा
असावा.
अयोग्य
वाढ
झालेले
डोळे
असलेल्या
कांड्यांची
संख्या
१०
टक्क्या
पेक्षा
कमी
असावी.
३)ऊस
लागवडीच्या
वेळी,
बेण्याचे
वय
१०-११
महिने
असावे.
अनेक
शेतकरी
वर्षानुवर्ष
तेच
ते
बियाणे
लागवडीसाठी
वापरतात,
तसे
न
करता,
दर
३-४
वर्षांनी
बेणे
बदलावे.
४) कांडीची
लांबी
आणि
जाडी
एकसारखी
असावी.
बेणे
उसाचा
(कांडीचा) व्यास
१.५
से.मी.
पेक्षा
कमी
नसावा.
५)
बेणे
रोग
व
किडमुक्त
असावे,
असे
रोग
व
किडमुक्त
बियाणे
न
घेतल्यास
उगवण
कमी
व
कमजोर
होते.
अश्या
प्रकारे
ऊस
कीड
व
रोगाला
लवकर
बळी
पडतो
व
उत्पादनामध्ये
लक्षणीय
घट
येते.
६) कोंब
आलेल्या
डोळ्यांची
संख्या
ऐकून
डोळ्यांच्या
संखेच्या
४
टक्क्या
पेक्षा
जास्त
नसावी.
मुळ्या
फुटलेला,
पांग
फुटलेला
व
तुरा
आलेला
ऊस
बेण्यासाठी
वापरू
नये.
७)
डोळ्यांची
वाढ
चांगली
(पूर्ण झालेली
नसावी)
व
डोळे
फुगीर
असावेत.
८)
खोडवा
ऊस
बेण्यासाठी
वापरू
नये.
९) डोळे
जास्त
जुने
व
निस्तेज
नसावेत,
डोळे
हिरवे,
फुगीर
व
ताजे
असावेत.
जास्त
वयाचे
बेणे
वापरणे
भाग
पडत
असेल
तर
बुडाकडील
जुन्या
कांड्या
काढून
टाकाव्यात.
कारण
त्याचे
डोळे
कठीण
व
तपकिरी
रंगाचे
झालेले
असावेत.
हिरवट
रंगाचे
डोळे
असलेला
उसाचा
वरचा
भाग
घ्यावा.
१०) बेणे
तीक्ष्ण
धारेच्या
कोयत्याने
तोडावे
व
कोयता
अधूनमधून
फिनेलच्या
द्रावणात
बुडवून
निर्जंतूक
करावा.
११) बेणे
ताजे
असावे,
ऊस
तोडल्यापासून
२४
तासाच्या
आत
बेणे
लागवडीसाठी
वापरावे.
बेणे
शिळे
झाल्यास
५००
ग्रॅम
चुना
२००
लिटर
पाण्यात
लागणीपूर्वी
२४
तास
अगोदर
बुडवून
नंतर
बेणे
प्रक्रिया
करावी.
१२) योग्य
बेणे
निवडल्यास
बेण्याची
उगवण
९०
टक्क्यांपेक्षा
जास्त
होते,
त्यामुळे
खर्चात
बचत
होते.
१३) योग्य
बेणे
निवडल्यास
तोडणीच्या
वेळी
वजनदार
उसाची
एकरी
संख्या
४५,०००
ते
९०,०००
पर्यंत
राहते.
१४) योग्य
बेणे
निवडल्यास
खत,
पाणी
व
मशागतीस
ऊस
चांगला
प्रतिसाद
देतो.
बेणे
छाटणी
:
दोन डोळ्यांच्या
बेणे/
टिपर्या
धारदार
कोयत्याने
कराव्यात.
बेणे
तोडताना
ते
चिरडू
किंवा
पिचू
नये.
बेणे
टिपरी
तयार
करताना
बुडख्याकडील
बाजूच्या
डोळ्याचा
खालचा
भाग
२/३
ठेवावा
(५-८
से.मी.)
व
शेंड्याच्या
बाजूच्या
डोळ्याचा
वरचा
भाग
१/३
ठेवून
(३-५
से.मी.)
बेणे
टिपरी
तोडावी.
एक
डोळा पद्धत
: -
ही पध्दत
आडसाली
व
पूर्वहंगामास
उपयुक्त
आहे.
एक
डोळा
पध्दतीने
प्लॅस्टिक
पिशवीत
ऊस
रोपे
तयार
करून
वापरता
येतात.
या
पध्दतीने
उसाच्या
बेण्याची
६६
टक्क्यां
परियंत
बचत
करता
येते.
दोन
डोळा टिपरी
: -
दोन डोळ्यांची
टिपरी/
बेणे
तयार
करताना
वरचा
भाग
१/३
व
खालचा
भाग
२/३
ठेवावा.
टिपऱ्या/
बेणे बनविताना
धारदार
कोयता
वापरावा.
टिपऱ्या
सरीत
लावताना
दोन
टिपऱ्यांतील
अंतर
१५-२०
सें.मी.
ठेवून
दोन्हीही
डोळे
बाजूस
राहतील
अशा
बेताने
लागण
करावी.
दोन
डोळा
पद्धतीने
३५
टक्के
बेणे
व
खर्चात
बचत
होते.
तोडणीपर्यंत
एक
चौरस
फुटात
१ ऊस
याप्रमाणे
४०
आर
(एक एकर)
क्षेत्रात
४५
ते
५०
हजार
ऊस
जोपासता
येतात.
तीन
डोळा पद्धत
-
या पध्दतीमध्ये
बेणे
जास्त
लागते.
खर्च
जास्त
येतो.
फुटवे
जास्त
असल्याने
एक
एकर
क्षेत्रात
४५
ते
५०
हजार
ऊस
जोपासता
येत
नाहीत.
बेणे
प्रक्रिया :-
बेणे प्रकिया
करताना
प्रथम
रासायनिक
प्रक्रिया
व
नंतर
जैविक
प्रक्रिया
करावी.
उसाची लागण
करण्यापूर्वी
बेणे
कार्बेन्डॅझिम
(बाविस्टीन) या
बुरशीनाशकाच्या
०.१
टक्का
द्रावणात
(१०० ग्रॅम
कार्बेन्डॅझिम
१००
लिटर
पाण्यात)
१०
ते
१५
मिनिटे
बुडवून
ठेवावे.
बेण्याला
खवले
किंवा
पिठ्या
किडीचा
उपद्रव
असल्यास
उसाचे
बेणे
मॅलॅथिऑन
५०
ईसी
३००
मि.लि.
किंवा
डायमिथोएट
३०
ईसी
२५०
मि.लि.
१००
लिटर
पाण्यात
ही कीटकनाशके मिसळून
१०
ते
१५
मिनिटे
बुडवून
ठेवावीत,
नंतर
लागण
करावी.
या
रासायनिक
बेणे
प्रक्रियेमुळे
उसावर
सुरवातीच्या
काळात
येणारे
खवले
कीड
आणि
पिठ्या
ढेकूण
या
किडींपासून
आणि
जमिनीमधून
होणाऱ्या
बुरशीजन्य
रोगांपासून
संरक्षण
मिळते.
बेण्याची
उगवण
चांगली
होते,
रोपांची
सतेज
- जोमदार वाढ
होते
आणि
परिणामी
उत्पादनात
वाढ
होते.
नंतर जैविक
बेणे
प्रक्रिया
करावी.
यासाठी
प्रथम
१००
लिटर
पाण्यात
१०
किलो
अॅसीटोबॅक्टर
किंवा
अझॅटोबॅक्टर
जिवाणूसंवर्धक
आणि
१.२५
किलो
स्फुरद
विरघळवणारे
जिवाणू
संवर्धक
चांगल्या
प्रकारे
मिसळावे.
त्यानंतर
उसाच्या
टिपऱ्या
या
द्रावणात
३०
मिनिटे
बुडवून
लागवडीसाठी
वापराव्यात.
उसाच्या
टिपऱ्यांमध्ये
अॅसीटोबॅक्टरचा
किंवा अझॅटोबॅक्टर यांचा
शिरकाव
होऊन
सदर
जिवाणू
उगवणीनंतर
उसामध्ये
आंतरप्रवाही
अवस्थेत
राहून
हवेतील
नत्राचे
स्थिरीकरण
करून
हा
नत्र
उसाला
उपलब्ध
करून
देतात.
यामुळे
उसाला
वापरण्यात
येणाऱ्या
रासायनिक
नत्र
खतात
(युरिया) ५०
टक्के
बचत
करता
येते.
त्याचप्रमाणे
सदर
मिश्रणात
वापरण्यात
आलेले
स्फुरद
विरघळवणारे
जिवाणू
उसाखालील
जमिनीतील
अविद्राव्य
स्फुरदाचे
विघटन
करून
उसाला
स्फुरद
उपलब्ध
करून
देतात.
स्फुरद
विरघळवणारे
जिवाणू
संवर्धकाच्या
वापरामुळे
उसाला
वापरण्यात
येणाऱ्या
रासायनिक
स्फुरद
खतात
(सिंगल सुपर
फॉस्फेट)
२५
टक्के
बचत
करता
येते
असे
दिसून
आले
आहे.
बेणे
प्रक्रियेमुळे होणारे फायदे
:
१) ऊस बेण्याची
उगवण
चांगली
होते,
उसाच्या डोळ्यांतून
जाड व सशक्त कोंब बाहेर पडतात. रोपे
तेजदार
व
जोमदार
दिसतात,
मुळांची वाढ चांगली होते.
२)
सुरवातीच्या
काळात
पिकास
कीड
व
रोगांपासून
संरक्षण
मिळते.
३)
उगवणीनंतर
रोग-कीड
नियंत्रणापेक्षा
बेणे
प्रक्रियेस
कमी
खर्च
व
कमी
वेळ
लागतो.
४) जैविक
बेणे
प्रक्रियेमुळे
रासायनिक
खतात
बचत
करता
येते,
अर्थातच किमती वाढलेल्या खतांचा वापर, काही प्रमाणात कमी करता येतो व उत्पादन
खर्चात बचत करता येते. उत्पादनवाढीबरोबर
जमिनीची
सुपीकता
टिकून
राहते.
एक डोळा
पद्धतीने
रोपे
बनवून
लागण
केल्यास
हेक्टरी
१२,०००
रोपे
लागतात.
दोन
डोळा
पध्दतीने
लागण
केल्यास
हेक्टरी
२५,०००
टिपरी
लागतात.
रोपे
लावायची
असल्यास
१००
ते
१२०
सें.मी.
अंतरावर
सऱ्या
पाडून
सरीत
पाणी
देऊन
सरी
भिजवावी.
नंतर
प्लॅस्टिक
पिशवी
काढून
पिशवीतील
रोप
मातीसह
सरीत
हाताने
दाबावे.
दोन
रोपांतील
अंतर
४५
ते
६०
सें.मी.
ठेवावे.
लेखक : - डॉ. अमोल विजय शितोळे (पी. एच. डी. कृषी )
No comments:
Post a Comment