निंबोळी अर्क घरच्याघरी तयार करता येतो. तसेच निंबोळीवर
आधारित म्हणजे अझाडिरेक्टीन या सक्रिय घटकावर आधारित कीटकनाशक बाजारात उपलब्ध
आहे. निंबोळी अर्क तयार करण्याची कृती अशी आहे.
निंबोळ्या गोळा करून त्या चांगल्या साफ कराव्यात. फवारणीच्या आदल्या दिवशी आवश्यक तितक्या निंबोळ्या कुटून बारीक कराव्यात.
आवश्यक सामुग्री
५% तीव्रतेचे/ शक्तीचे १०० लिटर कडुलिंबाच्या लिंबोळीचा अर्क तयार करण्यासाठी
- कडुलिंबाच्या लिंबोळ्या (पूर्णपणे सुकलेल्या) – ५ किग्रॅ
- पाणी (चांगले व स्वच्छ) – १०० लिटर
- साबण (२०० ग्रॅम)
- गाळण्यासाठी कापड
बनवण्याची पद्धत
- गरजेप्रमाणे कडुलिंबाच्या लिंबोळ्या ( ५ किग्रॅ) घ्या.
- त्या दळून त्यांची पावडर बनवा.
- १० लिटर पाण्यात ही पावडर रात्रभर भिजवा.
- दुसऱ्या दिवशी सकाळी लाकडी काठीने हे पाणी दुधासारखे पांढरे दिसेपर्यंत ढवळा.
- दुहेरी कापडातून गाळून एकंदर १०० लिटर बनवा.
- ह्यामध्ये १% साबण घाला (प्रथम साबणाची पेस्ट बनवा व नंतर ती सर्व पाण्यात मिसळा).
- चांगले ढवळून वापरा.
टीप
- कडुलिंबाच्या लिंबोळ्या धरतेवेळीच झाडावरून गोळा करा आणि सावलीत वाळवा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लिंबोळ्या गोळा कराव्या.
- आठ महिन्यांपेक्षा जुन्या निंबोण्या वापरू नका कारण इतक्या जुन्या बियांमध्ये जरूर ती कीडनाशक शक्ती राहात नाही
- नेहमी निंबोण्यांचा ताजा अर्क (NSKE- Neem seed kernel extract) वापरा.
- योग्य परिणाम मिळण्यासाठी दुपारी ३.३० नंतर तो फवारा.
लेखक : - डॉ. अमोल विजय शितोळे (पी. एच. डी. कृषि)
Very nice article with lots of information. Thanks for sharing this one with us.
ReplyDeletePharmaceuticals Buyers Suppliers Details